धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच त्याचा फटका हंगामी फळांना देखील बसला आहे. वाढत्या तापमानामुळे फळांचा राजा आंबा खराब होऊ लागला आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत कमी किमतीत आंब्यांची विक्री करावी लागत आहे.