आमदार माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या आमदारकीला स्थगिती मिळाल्याने ती सुरक्षित राहिली आहे. या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कोकाटे यांच्यावरील जनविश्वासाचे हे द्योतक मानले जात आहे.