मालेगाव-मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला. मनमाड-इंदोर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात शेतकरी संतप्त आहेत. शासनाकडून मनमानी पद्धतीने व कमी दराने जमिनी अधिग्रहित केल्या जात असल्याने तीव्र विरोध होत आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार करूनही कार्यवाही होत नाहीये. शेतकऱ्यांनी योग्य मोबदल्याची आणि विचारविनिमयाची मागणी केली आहे.