मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून बीडकडे रवाना झाले आहेत. परळी इथल्या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरात बैठक होणार आहे. या बैठकीला मनोज जरांगे पाटील हे स्वतः उपस्थित राहणार असून सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.