मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली ते शिवनेरी पायी दिंडीचा संकल्प केला आहे. कुटुंबासह राजाच्या चरणी नतमस्तक होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पुढील वर्षी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून हजारो लोक पायी येतील, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले. सात-आठ दिवस लागतील तरी सर्वांनी पायीच यावे, असा त्यांचा निर्धार आहे.