जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण पार पडलं. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी या पुतळ्याचं लोकार्पण केलं असून यावेळी भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासह विविध पक्षातील स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.