मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. आंदोलकांनी पहिल्यादिवसांपासून आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी केली आहे. तीन दिवसांपासून मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरात गर्दी करत असून काही स्टेशनवर विश्रांती करताना दिसली. तर आज आंदोलकांनी स्टेशनवरच थर लावले.