मनोज जरांगे पाटील यांनी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे स्वर्गीय रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केल आहे. मागील पंधरवड्यात जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवून परतीच्या मार्गावर असताना जमदाडे यांचा बीडमध्ये अपघाती मृत्यू झाला होता.