मराठा नेते मनोज जरांगे पाटील रविवारी पनवेल दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पनवेलमधील मराठा भवनचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच जरांगे पाटील मराठा कृतज्ञता मेळाव्यालाही संबोधित करणार असून, हा दौरा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.