मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींना अटक न झाल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे. ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांशी खेवरे पाटलासंदर्भात चर्चा करणार आहेत. आरोपींना अटक करणे ही त्यांची प्रमुख मागणी असून, ती पूर्ण न झाल्यास दिल्लीत मोठे आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.