वाल्मिक कराड जामिनावर सुटल्यास महाराष्ट्रात चाकही फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या संभाव्य सुटकेवरून ते आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.