मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिरात मराठा सेवकांनी महापूजा आणि महाआरती केली. राज्य सरकारला सद्बुद्धी मिळावी, मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषणाची वेळ येऊ नये, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.