जळगाव जिल्ह्यातील यावल सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिराजवळ असलेला धबधवा यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे. यंदा जून महिन्यात पावसाने जेमतेम सरासरीची पन्नाशी गाठली होती. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला.