बीडमधल्या पाटोद्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान झालं आहे. पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पाटोदा शहरासह परिसरात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान झालं आहे.