नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे बळ मिळाले असून काँग्रेसच्या माजी महापौर शिला किशोर भवरे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला राजकीय धक्का मानला जात आहे.