धाराशिव -जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तुळजाभवानी मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊंची मूर्ती सिंहासनावर ठेवून अभिषेक व आरती करण्यात आली. सकाळी सात वाजता पार पडलेल्या या विशेष पूजेला कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.