गेल्या चार दिवसापासून मराठा आंदोलकांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात हजारो महिला आणि पुरुषांनी भाग घेतला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरचा संपूर्ण परिसरच भगवामय झाला आहे. मिळेल त्या ठिकाणी मराठा आंदोलक गाड्या पार्क करून आंदोलनात भाग घेत आहेत. काही आंदोलकांनी तर थेट महापालिका मुख्यालयासमोर ट्रक पार्क करून ट्रकमध्येच ठेका धरला होता.