हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर यांनी नाशिकच्या येवला शहराला भेट देऊन पैठणी खरेदीचा आनंद घेतला. तसंच याप्रसंगी पैठणी कशी तयार होते हे पाहण्यासाठी पाटकर यांनी प्रत्यक्ष पैठणी विणकारांच्या घरी जाऊन हातमागावर पैठणी तयार होताना प्रात्यक्षिक पाहिलं. यावेळी येवल्याच्या पैठणीचं मन भरून कौतुकदेखील पाटकर यांनी केलं.