घाटकोपमध्ये एका मराठी कुटुंबाला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी कुटुंबाने घरात कुत्रा पाळला होता. त्यावरुन हा सर्व वाद झाला. मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाने घरात घुसून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. घाटकोपर पूर्वेला रायगड चौक परिसरात दोन्ही कुटुंब राहतात. त्यांच्यात हा वाद झाला.