जळगावात आरटीओ विभागाने मराठी भाषेच्या मुद्द्यावरून रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी थांब्यावरील रिक्षा चालकांची तपासणी केली आहे. रिक्षा चालक मराठी भाषा बोलतात की नाही यासंदर्भात आरटीओ विभागातर्फे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली.रिक्षा चालकांना सूचना देण्यात आल्या असून ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना नोटीस देऊन एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. एक महिन्यानंतर मराठी भाषा आली नाही तर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तपासणी दरम्यान सर्व मराठी भाषिक रिक्षा चालक आढळून आले परप्रांतीय कुणीही आढळून आला नसल्याने कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.