अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू झालेले कळस कृषी आणि डेअरी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती विकासाची नवी वाट दाखवणारे ठरत आहे. संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या या प्रदर्शनाला जवळपास चार लाखांपेक्षा जास्त शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी भेट देत शेतीशी निगडीत नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेतले.