संगमनेरमध्ये नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले-संगमनेर मार्गे नेण्यासाठी आणि शिर्डी - शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मागण्यांसाठी आज मोर्चा आयोजित करण्यात आला होता. अकोले येथून बाईक रॅलीने निघालेला मोर्चा संगमनेर प्रांतकार्यालावर धडकला. किरण लहामटे, डॉ. अजित नवले, अमित भांगरे यांच्या सह विविध पक्षातील नेते आंदोलनात सहभागी झाले होते.