रक्षाबंधनाच्या सणाला अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने धुळे शहरातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. शहरातील फुलवाला चौक परिसरात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची आणि मुलींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.