इगतपुरी तालुक्यातील वासाळी या आदिवासीबहुल गावात सुमारे २०० वर्षांची परंपरा लाभलेला जगदंबा यात्रा उत्सव अर्थात ‘बोहाडा’ उत्साहात साजरा करण्यात आला. होळी पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा सात दिवसांचा उत्सव आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. उत्सवादरम्यान विविध देव-देवता, दैत्य आणि पौराणिक पात्रांचे मुखवटे व वेश परिधान करून संबळ आणि पिपाणीच्या तालावर मिरवणुका काढण्यात आल्या.