महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मातृभाषा असलेल्या मराठीच्या पेपरमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा पैठणमध्ये अक्षरशः फज्जा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांची उपस्थित असतानाही उघडपणे कॉपीची देवाणघेवाण सुरू होती. हा सर्व प्रकार काल घडला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.