कॉम्रेड पानसरे यांच्या “शिवाजी कोण होता” या पुस्तकावरून राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल होत असून, त्याविरोधात विरोधी पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.. या पार्श्वभूमीवर निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलढाण्यातील संगम चौकात सामूहिक पुस्तक वाचन आंदोलन करण्यात आले.