शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.