माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांची ग्रामस्थांनी वाचवल्याची घटना घडली आहे. गारबेट ट्रेकदरम्यान हा जीवघेणा प्रसंग घडला. पावसाने अचानक नाल्याला मोठा पूर आला. यात पर्यटक अडकले असून त्यांची सुटका स्थानिकांच्या तत्परतेने झाली आहे. ग्रामस्थांनी धाडसी प्रयत्न करुन नाल्यात अडकलेल्या या 25 पर्यटकांची सुटका केली आहे.