पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील काही कंपन्यांचे अनधिकृत बांधकाम आणि शेड पीएमआरडीए कडून हटवले जातायत. ही कारवाई अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंच्या सांगण्यावरून होत आहे असा आरोप करत स्थानिकांनी आंदोलन केले आहे. पीएमआरडीएने या कंपन्यांना रीतसर नोटीसा देऊन ही कारवाई सुरु केलीये, असा कारवाईला आलेल्या अधिकाऱ्यांचा दावा आहे.