व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात उत्पादित होणाऱ्या लाल गुलाबांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबांची काढणी सध्या वेगात सुरू असून, शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.