मावळ तालुक्यात पावसाने जून महिना संपेपर्यंत दडी मारली होती. यावर्षी पीक येईल का नाही अवस्था शेतकऱ्याची झाली असतानाच मागील दोन दिवसात चांगला पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. पवन मावळातील दारुबरे येथे सोयाबीन पेरणीची लगबग चालू झाली आहे.