मावळ तालुक्याला इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सध्या खरीप हंगाम चालू झाला आहे. मावळ तालुक्यातील पाहिली भात लागवड एस. आर. टी. पद्धतीने मौजे शिळीम्ब गावात प्रगतशील शेतकरी लहू धनवे याच्या शेतात 136 से.मी. रुंदीचे गादी वाफेकरून करण्यात आली.