मीरा-भायंदर-वसई-विरार (MBVV) क्राईम ब्रांचने दाऊद इब्राहिमचा निकटवर्ती गँगस्टर सुभाष सिंह ठाकूरला फतेहगढ जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आहे. विरारमधील बिल्डर चव्हाण यांच्या गोळ्या झाडून झालेल्या हत्येप्रकरणी ठाकूर मुख्य आरोपी आहे. त्याने जेलमधूनच हत्येचा कट रचून सुपारी दिल्याचा गंभीर आरोप आहे, यामुळे तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत.