पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा भाजप पदाधिकाऱ्याकडून छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलयानंतर याप्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर ४ महिन्यानंतर महापालिकेनं गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.