नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता ड्रोनने औषध पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे २२ आरोग्य केंद्रे आणि १२० उपकेंद्रांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे.