मीरा-भाईंदरमधील पारिजात बिल्डिंगमध्ये सकाळी आठ वाजता एका घरात बिबट्या शिरला. घरात असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बिबट्याला पकडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.