इटली दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पार्ले मेलोडी चॉकलेटचे पॅकेट भेट दिल्यानंतर त्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाने अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले. शहरातील गजबजलेल्या बाबा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना यावेळी मेलोडी चॉकलेटचे वाटप करण्यात आले.