सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वडाची पूजा करताना पाहायला मिळतात. पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सिंधुदुर्ग मध्ये अनोखी प्रथा पाहायला मिळत आहे. कुडाळ शहरात गवदेव येथे पुरुषही वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळतात. सात जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी पुरुषही वडाला फेऱ्या मारताना पाहायला मिळतायत. गेले सतरा वर्ष प्रथा अजूनही कायम सुरु आहे.