सातारा येथील अंगापूर फाट्याजवळ असणाऱ्या रस्त्यावर एका मनोरुग्ण व्यक्तीचा चांगलाच धुडगूस पाहायला मिळाला. गोपाल असे या व्यक्तीचे नाव असून तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्यामुळे आणि चार पायावर चालत असल्यामुळे या व्यक्तीला रेबीज झाला असावा अशी चर्चा सर्वत्र पसरू लागली मात्र त्याला स्थानिक लोकांनी पकडून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली यानंतर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे... सध्या त्याला एका बंद आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे.