नागपूरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश देण्यात आला आहे. 'स्वीप' उपक्रमांतर्गत मनपाद्वारे जनजागृती करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ईश्वर देशमुख मैदानावर बलून फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमातून निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.