सामान्य व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे. मात्र, मेटा प्लॅटफॉर्म्स व्यावसायिक आणि ॲडव्हान्स फीचर्ससाठी सशुल्क सबस्क्रिप्शन प्लॅन आणत आहे. यामध्ये बिझनेस लिंक्स, मल्टी-डिव्हाइस वापर, मोठ्या फाइल्स शेअरिंग आणि मेसेज शेड्युलिंगसारख्या सुविधा असतील. घाबरण्याचे कारण नाही, ही सुविधा मुख्यतः प्रोफेशनल वापरासाठी आहे.