लग्नाच्या अक्षता पडत असतानाच वरुण राजाचे आगमन झालं. रत्नागिरी येथील खेडशी गावातील दुपारच्या सुमारातील प्रकार आहे. लग्नाच्या अक्षता पडत असताना पावसाचे आगमन झाल्याने वऱ्हाडी मंडळीची धावपळ सुरु झाली. खेडशी गावात अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने मंडपात धावपळ झाली. आज सकाळपासून कोकणात पावसाळी वातावरण असून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा दिला आहे.