आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात काल अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.