बीडमध्ये मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींनी प्रवेशद्वारावर गोंधळ केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. प्रतिनिधीचं ओळखपत्र तपासून पोलिसांकडून प्रवेश देण्यात येत आहे.