बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेचे 12 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. या सभेबाबतचे बॅनर फुलसंगी फाटा येथे लावण्यात आले होते. मात्र या बॅनर वरती काही अज्ञातांकडून काळे फासण्यात आले. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी काळे फासलेल्या बॅनरला दुग्धाभिषेक घालण्यात आला.