पालघर जिल्ह्यात गेल्यावर्षी सरकारी खरेदी योजनेअंतर्गत घेतलेली लाखो भाताची पोती अद्यापही भरडाईच्या प्रतीक्षेत आहेत.सरकारकडून गेल्या अनेक महिन्यांपासून भरडाईची देयके न मिळाल्याने मिल मालकांनी भरडाई प्रक्रिया सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मिल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले वीज बिले थकीत असून मालकांकडे त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने लाखो पोती गोडाऊनमध्येच रखडली आहेत. दरम्यान, सरकारने गेल्या दहा वर्षांपासून गोडाऊन भाडे न दिल्याने यावर्षी गोडाऊन मालकांनी गोडाऊन भाड्याने देण्यासही नकार दिला आहे.