सोलापूरमध्ये एमआयएम पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरणार आहे. पक्षाने पंचवीस उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन एमआयएम निवडणुकीला सामोरे जाईल. महापालिकेतील यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष सज्ज झाला आहे.