"युती तुटली, त्यामुळे आता नो राणा नो पाणा... फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा," असं वक्तव्य भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांनी अमरावती महानगरपालिकेच्या प्रचार सभेत केलं. भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटल्याने अपक्ष उमेदवारांना भाजपने पाठिंबा दिला आहे. भाजपसोबतच अपक्ष उमेदवारांना निवडून आणण्याचा मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून प्रचार केला जात आहे.