राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड पद्धती, उत्पादन क्षमता, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पाहणी महत्त्वपूर्ण ठरली.