पालकमंत्री पंकज भोयर यांनी मॅरेथॉनमध्ये चक्कर येऊन पडलेल्या धावपटूला तातडीने मदत केली. रस्त्याने जाताना त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून धावपटूला पाणी दिले आणि रुग्णवाहिका बोलावून सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या माणुसकीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे स्पर्धकाला वेळेवर आरोग्य सुविधा मिळाली आणि तो लवकर बरा झाला.